Saturday 11 January 2020

स्वप्न 2

काल रात्री एक स्वप्न पडलं. बऱ्याचदा दुपारी मी, आई आणि पप्पा घरी असतो तसेच त्या दिवशीही होतो. पप्पा दुसऱ्या खोलीत होते. आई माझ्यशेजारीच बसल्या होत्या. मला माझ्या समोरच्या खिडकीतून शाळेच्या मुलाची सॅक वरती हवेत फेकल्यासारखी दिसली आणि ती खाली पडली. इतक्या वरपर्यंत कोणी कसंकाय सॅक फेकू शकेल म्हणून मी खिडकीत पहायला गेले तर समोरचा रस्ताच वरती उचलला जाऊन कोणीतरी फेकून डोळ्यासारखा माझ्या समोर उचलला गेला आणि नंतर पहिल्या मजल्याच्या उंचीपर्यंत येऊन अस्ताव्यस्त पडला. ज्वालामुखी होतोय आणि त्यामुळे भूकंप होतोय हे लगेच माझ्या लक्षात आलं. हे होणारच होतं, होऊ नये असं कितीही वाटलं तरी हे झालंच.
मी आईंना म्हटलं, आता घरात रहाणं खूप धोक्याचं आहे, बाहेर चला लगेच..आणि त्या मागे येत आहेत की नाही हे समजायच्या आतच माझ्यासमोर माती सिमेंट गळायला लागलं. मी लगेचच बाहेर आले तर माझ्यामागे ती इमारत जमीनदोस्त होण्याच्याच बेतात होती. ती माझ्याच बाजूला कलायला लागली होती. आता ती अंगावर पडणारच आहे तर मी शक्य तितक्या लांब पाळायचा प्रयत्न केला पण अजून पुढे पळालो तर समोर खवळलेला समुद्रच दिसत होता. आता माझ्याकडे दोनच पर्याय होते, सगळी इमारत अंगावर घ्यायची की समुद्रात उडी मारायची. समुद्रात उडी मारली तर अजून काही मिनिटं पोहून वाचता येईल. त्यामुळे मी समुद्रात उडी मारली. उभीच्या उभी समुद्रात गेले. नाकातोंडात पाणी गेलं. आता काही क्षणातच सगळं संपणार याची जाणीव झाली. आणि शेवटचा एकच विचार मनात आला, जगण्याची संधी मिळाली असती तर चांगलं काहीतरी केलं असतं....
नंतर जाग आल्यानंतर आपण जिवंत आहोत या जाणिवेचा मी पुढची काही मिनिटं आनंद घेतला. त्यांनतर हात पाय हलवून आपले अवयव शाबूत आहेत याची खात्री करून घेतली... आणि मग लक्षात आलं, माणूस स्वप्न बघतच नाही तर ते अनुभवूही शकतो....
अमृता देशपांडे

2 comments:

  1. याला serrealism म्हणतांत, absurdity चर्या कुशीत झोपलेला असतो तो.. ते स्वप्नच असतं पण आपण त्या गदारोळात नाही हे जाग आल्यावर कळलं आणि हायसं वाटतं पण त्यातली, लांब उभे राहून भोगायची खुमारी, तुम्हाला तसंच डोळे मिटून त्याची प्रार्थना करायला भाग पडते, 'ए ! घे ना मला मिठीत परत' असं म्हणंत..

    ReplyDelete
  2. absurdity च्या कुशीत..

    ReplyDelete

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...