कधी कधी मनात विचाराचं खूप मळभ दाटून आलेलं असताना,खूप चिडचिड झालेली असताना काही सुचत नाही. समोर मलाच गिळून टाकेल इतकं काम असतानाही काही करावंसं वाटत नाही आणि मी झोपून जाते.
मी झोपते त्या खोलीच्या एका भिंतीला असलेला तो अदृश्य दरवाजा उघडतो आणि मग मला त्या स्वप्नातल्या पलीकडच्या खोलीत घेऊन जातो. तिथे प्रचंड धूळ असते आणि सगळं नको असलेले समान अस्ताव्यस्त पडलेलं असतं, पडलेलं काय टाकून दिलेलं असतं, माणसानं आपलं राहतं घर छान दिसावं म्हणूनच ही अडगळीची खोली तयार केली असावी. मी फ्रिल्सचा फ्रॉक घातलेला असतो, आणि तरंगतच त्या खोलीत जाते. आधी लाईटचं बटन शोधते, लाईट लागला की मग भिंतीशी ठेवलेली दोन मोठी फडताळं समोर येतात. ठेच लागणारच असते, पण मी सावरते, त्यात समान असं काही नसतं, पण तरी ती ठेवलेली असतात. समोरच एका भिंतीलगत पुस्तकांची मोठ्ठी एक भिंत तयार झालेली असते. त्यातली उचलली जातील ती एक एक पुस्तकं मी बाजूला काढून वाचायला बघते, फारसं काही कळत नाही, पण ही पुस्तकं कोणीतरी खूपच मौल्यवान असावीत म्हणून ठेऊन दिलेली असली पाहिजेत इतकंच समजतं. त्यातच एक वेगवेगळ्या शब्दांचे उगम आणि काळानुसार त्यांच्यात झालेले बदल सांगणारं मोठ्ठ पुस्तक असतं, ते माझं बरंच मनोरंजन करतं. या पुस्तकांना कोणी आपलं म्हणत नाही, कुणीतरी फेकून दिलंय या विचारांनीच मला कसंस व्हायला होतं..
कोणी नाही सांभाळलं तर मी नक्की संभाळीन असं मनात म्हणून मी पुढे जाते,
एका मोडक्या सुपात लाल रंगाच्या चपला ठेवलेल्या असतात. इतक्या छान चपला कोणी टाकून का दिल्या असतील? मी उत्सचुकतेनं त्या घालून पहाते तर त्यातल्या एकीचा बंदच तुटलेला असतो.. असं आहे तर..पण कुणाच्यातरी या फार लाडक्या असतील म्हणूनच तुटल्या तरी ठेवल्या असतील..
असंच फिरताना मी ही खोली स्वच्छ करून माझीच अभ्यासचो खोली करायचा विचार करते आणि हुरळून जाते..मळभ नाहीसं झालेलं असतं..मला प्रसन्न जाग आलेली असते...

Very nice one
ReplyDeleteKhup mastt
ReplyDeleteलिखाण मस्त..
ReplyDeleteकल्पना व मांडणी खुपच छान एकदम सुंदर.
ReplyDeleteKhupach chaan
ReplyDeleteखुप छान!
ReplyDeleteवा!क्या बात है,छान
ReplyDeleteखूप छान , खरंच कधी कधी आयुष्यात वाटणाऱ्या समस्या चे निराकरण झोपेत असताना चा स्वप्नामधून होते.
ReplyDeleteएकदम सुंदर
ReplyDeleteएकदम सुंदर
ReplyDelete