Monday 5 August 2019

अंघोळ


आज जरा अंघोळ करू या म्हणते

कसा असतो वासाचा शाम्पू,
रंगीत साबण पाहू या म्हणते..

थंडी पडलीय गोठवणारी
तरी आज पांघरुणातून बाहेर येऊन
ऊन ऊन पाणी अंगावर घेऊ म्हणते

केसांना पोमेड लावीन म्हणते
तोंडाला पावडर लावून
खारा शेंगदाणा होईन म्हणते

नन्तर अंगावर हलकीशी पोंड्स
मारीन म्हणते
बाजारात फेरफटका मारीन म्हणते

लाल लाल लाली, गुलाबी रुज
उंच सँडल्स घालून
खांद्यावर पर्स मिरवीन म्हणते

हे करीन म्हणते,
ते करीन म्हणते
मी मात्र आळशी
अजून बेडमध्ये बसून
एक कप चहा पिईन म्हणते

....शिशिर

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...