Tuesday 6 August 2019

मी ग्रेस बोलतोय

भळभळती जखम माझ्या भाळावर अश्वथाम्यासारखी।
संध्याकाळचा तो एकाकी निरवपणा माझ्या माथ्यावर।
दुःखाचे ते बुडून विरून जाण्याचे अलोट क्षण माझ्या भाळावर।
पण मी त्या दुःखाचा पर्वत पार करून तुझ्या दारी आलोय।
तू मला इतकं दिलयस,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
तू मला तुझ्या भूमीवर प्रसवलस
माझ्या कविता प्रसवल्यास,
तुझ्या मुशीतून ग्रेस जन्माला घातला,
तुझे इतके उपकार आहेत माझ्यावर,
की हे माझ्या मराठी माते, मी तुझ्या भूमीवर मरु इच्छित नाही।
शिशिर

No comments:

Post a Comment

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...