Friday 9 August 2019

पु ल आणि संगीत

पु लं आणि संगीत.
पु लं बद्दल सांगण्यासारखं अनेक गोष्टी आहेत. आज सकाळपासून आपण त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगतोय आणि वाचतोय. पण माझ्या आवडीचा त्यांचा एक गुणविशेष म्हणजे त्यांची गण्यातली आवड. 
वसंतराव देशपांडे, पंडीत कुमार गंधर्व, भीमसेन जोशी आणि मल्लिकार्जुन मन्सूर ही मंडळी त्यांची मित्र होती. ते अनेक दिवस त्यांच्या घरी रहायचे. 
त्यांच्या गुण गायीन आवडी या पुस्तकात त्यांनी पंडित मल्लिकार्जुन यांचा उल्लेख तर 'एक गाण्यात रहाणारा माणूस' अशी केला आहे. म्हणजे मल्लिकार्जुन सकाळी तोडीमध्ये रहातात, दुपारी सारंगाच्या पारावर असतात आणि उन्हं कलती व्हायला लागली की भीमपालसी मध्ये असतात!
याच पुस्तकात पंडित कुमार गंधर्व यांचा उल्लेख ते 'मंगल दिन आज' असा करतात.
त्यांनी वसंतराव देशपांडे यांनी आयुष्यात कसा मारवा हा एकच राग सहा महिने शिकला आणि त्याच रागामूळे इतर राग कसे त्यांना आपोआप अवगत झाले याचं सुंदर वर्णन करतात.
कुमारांची आणि पुलं ची खूपच गाढ मैत्री होती. पुण्यात आले की कुमार हमखास पुलं च्या घरी उतरत. कुमारांच्या मला भावलेले बालगंधर्व या कार्यक्रमाची संपूर्ण तालीम पुलं च्या घरी झाली होती!!
याशिवाय पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिराचं ज्या दिवशी उदघाटन झालं त्या दिवशी भीमसेन जोशी, सुधीर फडके, बालगंधर्व यांनी जोहार माय बाप जोहार हे भजन एकत्र गायलं त्याला पेटीची साथ पुलं नी केली..
याहूनही अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीतल्या अनेक भावगीत, नाट्यगीत आणि चित्रपट गीतांना संगीत दिलं. उदाहरणच द्यायचं झालं तर नाच रे मोरा, करू देत शृंगार (आशा भोसले), इंद्रायणी काठी (भीमसेन जोशी), कबिराचे विणतो शेले (माणिक वर्मा) अशी एकाहून एक सरस गाणी सांगता येतील. 
भीमसेन आणि माणिक वर्मा यांसारख्या शास्त्रीय गायकांकडून जो माणूस गाऊन घेतो त्याचं ज्ञान काय असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी!!!
©अमृता देशपांडे

1 comment:

  1. माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक

    ReplyDelete

सहजच

  खूप गोष्टींवर लिहायला सुचत असलं की मी काहीच लिहीत नाही, डायरी बंद करते, मन बंद करते आणि डोळे बंद करून झोपून जाते...तेच कालही झालं.. ये नी...